नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांनी विशेष सेवा पदक प्रदान केले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कार्यरत 11 पोलीस उपनिरिक्षक आणि 1 पोलीस अंमलदार अशा 12 जणांचा समावेश आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी अभिजित राऊत व इतर मान्यवरांनी हे विशेष सेवा पोलीस पदक प्रदान केले.
पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील 1148 अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान केले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक सागर माधवराव झाडे(पोलीस ठाणे किनवट), शिवाजी सिताराम शिंदे (पोलीस ठाणे मुदखेड), वैशाली निवृत्ती कांबळे(पोलीस ठाणे सोनखेड), प्रियंका पवार(पोलीस ठाणे धर्माबाद), नारायण मारोती शिंदे(कुंडलवाडी), राजेश मारोती नंद (नियंत्रण कक्ष), निजाम मुसा सय्यद(लिंबगाव), प्रदीप गोरखनाथ साखरे(विमानतळ), नरेश केशव वाडेवाल (भाग्यनगर), सचिन मुकूंदराव आरमाळ(उमरी), उमेश किशनराव कदम(शिवाजीनगर) आणि पोलीस मुख्यालय नांदेड येथील पोलीस अंमलदार आशिष प्रभु माने यांचा समावेश आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय ध्वजारोहणानंतर या सर्व 12 पोलीसांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे आणि अपर जिल्हाधिकारी बोरगावकर यांची उपस्थिती होती.