नांदेड (प्रतिनिधी)-सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवरील ‘ब्रेकिंग’ नावाने चालवल्या जाणाऱ्या एका ग्रुपच्या सदस्यत्वासाठी ५०० ते १००० रुपयांची मागणी केली जात असल्याची चांगलीच चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, संबंधित ग्रुपचा संचालक स्वतःला पत्रकार म्हणून ओळख देत असून, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही सदस्यत्वाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोप केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पूर्वी एका वृत्तपत्रात कार्यरत होता. त्यावेळीही बातमी प्रसिद्ध करण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा प्रकार समोर आल्याची चर्चा आहे. एका उपोषणकर्त्याकडून बातमी प्रकाशित करण्यासाठी ५०० रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र संबंधित बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली नाही. त्यानंतर पैसे दिलेल्या व्यक्तीने थेट वृत्तपत्र कार्यालयात जाऊन मालकाशी संपर्क साधला. या घटनेनंतर बातमीच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जाते. पत्रकारितेतील नैतिक मूल्ये जपण्याऐवजी काही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी माध्यमांचा वापर करीत असल्याची टीका यानिमित्ताने व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तीवर स्वतःच्या विचारांशी किंवा हितसंबंधांशी विरोधी भूमिका घेणाऱ्यांना ग्रुपमधून बाहेर काढण्याचाही आरोप आहे. विशेषतः त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबीयांबाबत आणि नागपुरी काका , विशिष्ट समाजाबाबत ग्रुपमध्ये कोणतेही सत्य अथवा टिप्पणी झाल्यास संपूर्ण ग्रुपच डिलीट करण्यात येतो. ग्रुप डिलीट झाल्यानंतर पुन्हा नवीन ग्रुप तयार करून सदस्यांना “सर्वांना हळूहळू ॲड केले जाईल” असे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात आर्थिक लाभ मिळवून देणारे किंवा जवळचे मानले जाणारे लोकच पुन्हा ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ग्रुप मधील झालेली चर्चा विशिष्ट समाजातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही पोहोचण्याचे काम हा एडमिन करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पत्रकारिता ही समाजहितासाठी आणि सत्य मांडण्यासाठी असते. मात्र सदस्यत्व, बातम्या किंवा प्रसिद्धीच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप जर खरे असतील, तर ही बाब पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला धक्का देणारी ठरू शकते. संबंधित पत्रकाराची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येण्याची मागणी पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,297 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन;राज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा परभणीमधील तक्रारदारांशी संवाद