अपर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी: विश्वास नांगरे पाटील: अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथून पोलीस आयुक्त, नागपूर शहर पदी बदली. रवींद्र सिंघल: पोलीस आयुक्त, नागपूर शहर येथून अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पदी बदली. पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकारी: संजय वर्मा: पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक येथून पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ पदी बदली. अर्चना त्यागी: पोलीस महासंचालक, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ येथून पोलीस महासंचालक, न्यायिक व तांत्रिक पदी बदली. विशेष पोलीस महानिरीक्षक/पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकारी: दत्तात्रय शिंदे: अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार येथून पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग, पुणे पदी पदोन्नतीने नियुक्ती. संजय शित्रे: पोलीस उप महानिरीक्षक, सायबर मुंबई येथून अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय पदी बदली. पोलीस अधीक्षक / पोलीस उपायुक्त / समादेशक स्तरावरील अधिकारी: प्रशांत मोहिते: पोलीस उपायुक्त, छ. संभाजीनगर शहर येथून पोलीस उपायुक्त, डायल ११२, नवी मुंबई पदी बदली. नीलाभ रोहन: पोलीस अधीक्षक, हिंगोली येथून पोलीस अधीक्षक, नांदेड पदी बदली. अभिनाश कुमार: पोलीस अधीक्षक, नांदेड येथून पोलीस उपायुक्त, पुणे शहर पदी बदली. श्रेणिक लोढा: अपर पोलीस अधीक्षक, खामगाव (बुलढाणा) येथून पोलीस अधीक्षक, हिंगोली पदी बदली. रुपाली आंबुरे: पोलीस उपायुक्त, डायल ११२, नवी मुंबई येथून पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदी बदली. शशिकांत सातव: पोलीस उपायुक्त, नागपूर शहर येथून पोलीस उपायुक्त, छ. संभाजीनगर शहर पदी बदली. रमेश धुमाळ: पोलीस उपायुक्त, अमरावती शहर येथून पोलीस उपायुक्त, नागपूर शहर पदी बदली. पीयुष जगताप: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथून अपर पोलीस अधीक्षक, खामगाव (बुलढाणा) पदी बदली. नारायण शिरगावंकर: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३, गडचिरोली येथून समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९, कुसळगाव (अहिल्यानगर) पदी बदली. प्रांजली सोनावणे: पोलीस अधीक्षक, गुअवि, अमरावती येथून पोलीस उपायुक्त, अमरावती शहर पदी बदली. वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती मिळालेले अधिकारी: नवदीप अग्रवाल: अपर पोलीस अधीक्षक, वाशिम येथून मा. राज्यपाल यांचे परिसहायक पदी पदोन्नतीने नियुक्ती. या सर्व शासन आदेशांवर स्वाक्षरी करणारे अधिकारी सुग्रीव धपाटे (शासनाचे सह सचिव) आहेत. Kanthak Suryatal Post Views: 3,435 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation खरा टायगर कोण? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अस्तित्वाचा लढा ब्रेकिंग ग्रुपमध्ये प्रवेशासाठी पैशांची मागणी? पत्रकाराच्या नव्या ‘व्यवसायाची’ चर्चा