नांदेड(प्रतिनिधी)-10 ऑगस्ट या एकाच दिवशी जिल्ह्यातील 30 पोलीस ठाण्यांनी अवैध दारु विक्री बाबत 93 गुन्हे दाखल केले. त्यात 95 आरोपी आहेत आणि 2 लाख 79 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील 36 पोलीस ठाण्यांनी काल 10 ऑगस्ट रोजी कार्यवाही करत 1324 देशी दारु बॉटल, 27 विदेशी दारु बॉटल, 285 लिटर हातभट्टी, 2245 लिटर रसायन आणि 1962 लिटर शिंदी असे साहित्य जप्त केले. या सर्व साहित्याची किंमत 2 लाख 79 हजार 895 रुपये आहे. Kanthak Suryatal Post Views: 2,359 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीची आत्महत्या दोन युवकांना मारहाण करून सहा जणांनी लुटले