नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील चुंगी नाकाजवळ एक शटर फोडून चोरट्यांनी त्यातून 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. सागर किशनराव ओदीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जूनच्या रात्री 8.30 ते 13 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान एका शोरुमचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील नाण्यांचा साठा, दोन ग्रॅमची लक्ष्मी मातेची मुर्ती, एक सॅमसंग मोबाईल व सीसीटीव्ही डीव्हीआर असा 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हा शटर हिरो होंडा कंपनीचे आहे. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 158/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार वाडगुरे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 963 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाण अत्यंत धुरंधर तपासिक अंमलदार असतांना एक कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयात पोलीस कोठडी नामंजूर;अनेक ताशेरे ओढत प्रकरणातील आरोपीनां जामीन दिला