मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे

आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार

नांदेड,- २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला. विविध योजनांचा लाभ देण्यास यापुढेही शासन वचनबद्ध असल्याचे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

तीन मुलींच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी कायदेशीर चौकशी सुरू आहे . तथापि, आवश्यकतेनुसार यापुढेही या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाईल. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांमध्ये शासन भक्कमपणे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

 

किनवट तालुक्यातील मौजे मारेगाव खालचे येथे पैनगंगा नदीच्या पात्रात स्वाती देविदास कांबळे ,पायल देविदास कांबळे तसेच ममता या 3 मुलींचा मृत्यू 27 मे 2024 रोजी झाला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-1989, अंतर्गत मयत पिडीतांच्या कुटुंबास देय असलेली अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी 8 जून 2024 रोजी त्यांच्या परीवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

तसेच अर्थसहाय्याची रक्कम अदा करण्यासाठी दस्ताऐवज प्राप्त करुन तात्काळ त्यांचे खाती देय रक्कम जमा करण्याचे आश्वासित केले. त्याव्यतिरीक्त दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन उपलब्ध असल्यास शासन निर्णयाप्रमाणे मदत करण्याचे आश्वासित केले. त्यामुळे त्यांच्या परिवारास मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!