नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहुर तालुक्यासाठी स्वतंत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही दोन पदे लवकरच अस्तित्वात येणार असल्याने नांदेड शहरात असलेला कामाचा ताण वाटला जाईल. जिल्हा न्यायालयाने 22 एप्रिल रोजी बार असोसिएशन किनवटला पाठविलेल्या एका पत्रानुसार माहुर आणि किनवट तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अशी दोन नवीन न्यायालय तयार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 14 एप्रिल 2024 रोजी दिलेला आहे. त्यासाठी न्यायालयाच्या ईमारती, न्यायाधीशांच्या राहण्यासाठी निवासस्थाने आदी भौतिक सुविधांबाबत तयारी करण्याच्या सुचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. या पत्रावर नांदेड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेशा कोसामकर यांची स्वाक्षरी आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,147 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड देगलूर येथील पोलीस ताब्यातील आरोपीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे