अर्धापूर पोलीसांनी 22 गोवंश भरलेला ट्रक पकडला; तीन बैल मरण पावले होते

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात आज भल्या पहाटे अर्धापूर पोलीसांनी पाठलाग करून पकडलेल्या ट्रकमध्ये 22 बैल सापडले. त्यातील 3 मरण पावलेले होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आज अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस उपनिरिक्षक शेख आयुब, पोलीस अंमलदार कदम, डांगे हे गस्त करत असतांना सकाळी 6 वाजता भोकरफाटा ते भोकर जाणाऱ्या रस्त्यावर बारसगाव पाटीजवळ त्यांनी एम.एच.40 बी.एल.3762 या ट्रकला थांबविण्याचा इशारा केला पण तो ट्रक थांबला नाही आणि पुढे पळाला अर्धापूर पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबविले. या ट्रकमध्ये गोवंश जातीची जनावरे प्राणांना वेदना होतील अशा स्थितीत कु्ररतेने, निर्दयीपणे कोंबून जनावरांची काळजी न घेता त्यांचा वाहतूक होत होती. हा ट्रक नागपुर येथून जनावरांना घेवून आला होता आणि हैद्राबाद(तेलंगणाकडे) जात होता. या ट्रकमध्ये एकूण 22 गोवंश जनावरे होती त्यात तीन बैल मरण पावलेल्या अवस्थेत होते. उर्वरीत 19 बैलांमध्ये दोन गोरे होते. या बैलांची एकूण किंमत 3 लाख 80 हजार आणि ट्रकची किंमत 7 लाख असा 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार महेेंद्र लक्ष्मणराव डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 428, 429 तसेच पशु संरक्षण अधिनियम 1976 च्या कलम 6, प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 मधील कलम 11(1)(ड)(ई) तसेच प्राण्यांचे परिवहन नियम 1978 मधील कलम 47 (अ), 48, 50, 56, (सी) सोबत मोटार वाहन कायदा कलम 184, 134/187 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना माहिती देणाऱ्याला धमकी
अर्धापूर पोलीसांना गोवंश घेवून जाणाऱ्या ट्रकची माहिती देणाऱ्या माहितीगाराला काही लोकांनी जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीसांनी जनावरांची गाडी पकडताच दोन तासानंतर हा प्रकार घडला. माझ्या जनावर वाहतुक करणाऱ्या गाड्यांची माहिती तु पोलीसंाना दिलास अशी धमकी देणारा मजहर रा.भोकर आणि हाजी असे दोन जण आहेत. त्यांनी मोबाईल फोनवरून फोन करून माहितीगाराला दिलेल्या धमकी प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी माहितीगाराच्या तक्रारीवरुन असंज्ञय अपरात क्रमांक 168/2024 दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 427, 504, 506, 507 आणि 34 जोडण्यात आले आहे. या एनसीचा तपास पोलीस अंमलदार तोरणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *