नांदेड(प्रतिनिधी)-हिप्परगाशाह या छोट्याशा गावातील डॉ.माधव संग्राम श्रीमंगले यांची कन्या श्रावणी हिने यंदाच्या नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 670 गुण संपादन करून यश मिळवले आहे.
हिपरगावशाह दिवाण या गावातील बालिका श्रावणी माधव श्रीमंगले हिने 12 वी नंतर उच्च शिक्षण प्रवेशासाठी राष्ट्रीय परिक्षा एजन्सीमार्फत होणाऱ्या नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 670 गुण मिळवून यश संपादन केले आहे. श्रावणीचे वडील डॉ.माधव श्रीमंगले हे आहेत. श्रावणीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.