नांदेड (प्रतिनिधी )-येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जयवंतराव काळे यांची बिलोली येथे बदली झाल्याबद्दल उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने निरोप समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाठ ( खु.) जिल्हा परिषद शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री.गादेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांची उपस्थिती होती. उस्माननगर केंद्रातील शिस्त प्रिय , उपक्रमशील , विविध स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तळमळीने तात्परतेने प्रयत्न करणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा केंद्रप्रमुख आणि केंद्रातील शिक्षकांचे, मित्रांचे आवडते श्री.जयवंतराव काळे सर यांची प्रदीर्घ सेवा करून त्यांची जिल्हा परिषद नांदेड विभागाने बिलोली येथे पुन्हा केंद्रप्रमुख म्हणून बदली झाल्याने उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात त्यांचा निरोप समारंभ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सुर्यकांत मालीपाटील , मुख्याध्यापक राहुल सोनसळे , यांनी काळे सर यांच्या काम करण्याची तळमळ, विद्यार्थ्यांसाठी असलेली धडपड व त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे सर यांनी आपल्या मनोगतात अनेक प्रसंग व विद्यार्थ्यांनी निष्ठापूर्वक अभ्यास करून गावाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे. असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी केले.यावेळी माणिक भिसे , प्रदीप देशमुख ,सुर्यकांत मालीपाटील, लक्ष्मण कांबळे, विठ्ठल ताटे पाटील ,लक्ष्मण भिसे , चौधरी , आदींची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 1,734 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू नागार्जुना पब्लिक स्कुलचे व्यवस्थापन शिक्षण उपसंचालकांना वेशीवर टांगते; सात शिक्षकांचे आमरण उपोषण