नांदेड- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड येथील सेवा ग्रुप, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या वतीने शहराच्या छत्रपती चौक परिसरात असलेल्या चतुर्थी रेस्टॉरंटजवळ दत्त मंदिर परिसरात कॅनल रोड वाडी बुद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी सेवा ग्रुप संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा विष्णुकांत वैजवाडे यांनी पुढाकार घेतला होता. नांदेड शहराच्या वाडी बुद्रुक परिसरातील छत्रपती चौक भागात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सेवा ग्रुप आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे यात जांभूळ, लिंब, वड, पिंपळ, आवळा, गणेरी, आंबा, बेल, करंजी यासह आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी वन अधिकारी, सामाजिक वनीकरणाचे संदीप चव्हाण, शरयू रुद्रवार यांच्यासह वंदना आरमाळकर, वैष्णवी वैजवाडे यासोबतच ग्रुप सदस्य अर्चना आठवले, रागिनी महामुनी, लक्ष्मीबाई कोत्तावार, मनीषा रोडे, वर्षा ईठोलीकार, शैलजा पाठक, शोभा बच्चेवार, मिरा नरवाडे, लक्ष्मी जलदावार, सुशीला आल्लमवाड, सृष्टी महामुनी, अनुराधा डावकरे, अंजली विजापुरे, त्त मंदिर ट्रस्टचे श्याम मंठाळकर, मंगला पाटील, अशोक जोशी, रमाकांत देशपांडे यांची उपस्थिती होती. तसेच वृक्षमित्र माधव सुवर्णकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला छत्रपती चौक परिसरातील अनेक वृक्ष मित्रांनी ही आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. Kanthak Suryatal Post Views: 1,337 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What Is Decentralized Identity? राज्यातच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेने कमतरता