देगलूर तालुक्यात 50 हजारांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-होटल ता.देगलूर या गावाच्या फाट्याजवळ एका व्यक्तीच्या ऍटोला अडवून त्याच्याकडून 50 हजार रुपये रोख लुटल्याचा प्रकार घडला आहे.
ऍटो चालक गोविंद किशनराव बोरगावकर रा.बोरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मेच्या रात्री 11 वाजेच्यादरम्यान ते आपला ऍटो घेवून बोरगावकडे जात असतांना होटल गावाच्या फाट्याजवळ दोन जण दुचाकीवर बसून आले आणि त्यांना थांबवून चाकुचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 50 हजार रुपये बळजबरीने लुटले आहेत. देगलूर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 222/2024 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *