नांदेड(प्रतिनिधी)-उनकेश्र्वर ता.किनवट येथील पोचन्ना मंदिराची दानपेटी चोरीला गेली आहे. यात 20 ते 25 हजार रुपये रोख रक्कम असेल असे लिहिले आहे. पाचन्ना मंदिराचे व्यवस्थापक राधाकृष्ण राघोबा कनाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 एप्रिलच्या 11 वाजेच्या सुमारास तेथील वाचमन यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता दान पेटी चोरीला गेल्याचे दिसले. या दानपेटीमध्ये 20 ते 25 हजार रुपये रोख रक्कम होती असे तक्रारीत म्हटले आहे. मांडवी पोलीसांनी हा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कदम अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 115 ग्रॅम वजनाचे 3 लाख 45 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरी गेले हायवा टिपर चोरीला गेला