अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळू वाहतुक करणाऱ्या हायवा गाडीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-वाळू वाहतुक करणाऱ्या हायवा गाडीने एका दुचाकीने धडक दिल्यानंतर 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महादेव पिंपळगाव फाटा येथे घडला आहे.
संगीता बालाजी वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 मे रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास पिंपळगाव महादेव फाटा येथे त्यांचे पती बालाजी मुंजाजी वाघ हे दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एम.5210 वर बसून प्रवास करत असतांना वाळु वाहतुक करणारी हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.7200 या गाडीने बालाजी वाघ यांच्या दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यांना लोकांनी आपल्या चार चाकी वाहनातून विष्णुपूरी येथे उपचारासाठी नेले असतांना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्धापूर पोलीसांनी हायवा चालक ज्याचे नाव माहित नाही याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 337, 338, 304(अ) नुसार गुन्हा क्रमांक 211/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक वड यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *