नांदेड(प्रतिनिधी)- एका 74 वर्षीय व्यक्तीला मोबाईल क्रमांकावर फोन करून 1 लाख रुपये दिले नाही तर तुझ्या पत्नीचा खून करतो असे धमकी देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष व्यंकटराव देशपांडे उर्फ सांगवीकर (74) हे देगलूरचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे घर शहाजीनगर देगलूर येथे आहे. दि.24 ते 26 फेबु्रवारी दरम्यान त्यांना रमेश उर्फ रमन तुकाराम काटकर (54) हा व्यक्ती मोबाईल फोनवर कॉल करून तु एकटाच राहतोस मला 1 लाख रुपये, पैसे दिले नाही तर मी तुझ्या पत्नीला जिवंत मारून टाकतो अशा धमक्या देत होता. या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी रमेश उर्फ रमन तुकाराम काटकर विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 387 नुसार गुन्हा क्रमांक 88/24 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक फड यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,661 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या कारागृहात जाणाऱ्या आरोपीकडे पोलीस पथकाने चाणक्ष नजरेने शोधला गांजा वाळकी येथे उद्यापासून जाळीचे बाबा यात्रा महोत्सवास प्रारंभ