नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चक्क हायवा टिपर चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. ईश्र्वर सुर्यकांत मोरे रा.भनगी ता.जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 एप्रिल ते 24 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेदरम्यान लक्ष्मी पेट्रोलपंपासमोरून त्यांचा हायवा टिपर क्रमांक एम.एच.26 बी.ई.9799 चोरीला गेला आहे. या हायवाची किंमत 20 लाख 70 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 906 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उनकेश्र्वर येथील पोचन्ना मंदिरातील दान पेटी चोरीला गेली मौजे कौठा ता.बिलोली येथे 2 लाखांचा ऐवज लंपास