अर्धापूर पोलीसांनी पॉपीस्ट्रॉ (डोडे)पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-दहशतवाद विरोधी पथक आणि अर्धापूर पोलीसांनी संयुक्तरित्या एका व्यक्तीकडून पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला आहे. या पॉपीस्ट्रॉचे वजन(डोडा) वजन 3.750 ग्रॅम आहे. या अंमली पदार्थाची किंमत बाजारात 22 हजार 500 रुपये आहे. सोबतच काही रोख रक्कम सापडली आहे. असा एकूण 23 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरिक्षक सुनिल नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास त्यांनी आणि अर्धापूर पोलीसांनी मिळून गोपालराम जोराराम चौधरी (26) रा.बालासर पोस्ट धनठिलीसर जि.नागोर(राजस्थान) ह.मु.दालबाटी धाबा श्रीराम पेट्रोल पंपाजवळ नांदेड अर्धापूर रस्ता येते आहे. या व्यक्तीकडे अंमलीपदार्थ विक्री केले जातात या माहितीवरुन ही धाड टाकण्यात आली होती. येथे गोपालराम चौधरीकडे 3.750 ग्रॅम पॉपीस्ट्रॉ (डोडा) सापडला. या व्यक्तीविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 8, 17, 20, 22 नुसार अर्धापूर पोलीसांनी 188/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत. प्राप्त माहितीनुसार अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या गोपालराम चौधरीला न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *