नांदेड(प्रतिनिधी)-क्रिप्टो करन्सीमध्ये 7 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा आला नाही म्हणून तीन जणांविरुध्द ठकबाजी व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय विठ्ठलराव आठवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी 15 डिसेंबर 2023 रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून हायओशीयन क्रिप्टो करन्सी कंपनीमध्ये 7 लाख रुपये गुंतवणूक केली. काही वेळेत कोटी रुपये मिळतील असा त्यांचा विश्र्वासघात व फसवणूक करण्यात आली. संजय आठवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हायओशीयन क्रिप्टो करन्सीतील प्रिन्स अग्रवाल, रजनिकांत विट्टे, मनोज चव्हाण या तिघांविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 116/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विश्र्वास देशमुख अधिक तपास करीत आहेत.