नांदेड(प्रतिनिधी)- भिसीमध्ये गुंतवलेले पैसे आणि गहान ठेवलेले दागिणे गायब करून काही जणांना 2 भावांनी मिळून 12 लाख 93 हजार 200 रुपयांचा गंडा घातला आहे. सुकेशनी प्रमोद जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जानेवारी 2023 ते 9 मार्च 2024 दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आकाश संभाजी पवार आणि संकेत संभाजी पवार यांच्यााकडे भिसीमध्ये 10 लाख 53 हजार 200 रुपये गुंवले होते. याचे कमिशन देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडे 4 तोळे सोन्याचे दागिणे गहान ठेवले होते. त्याची किंमत 2 लाख 40 हजार अशी एकूण 12 लाख 93 हजार 200 रुपयांची फसवणूक झाली आहे. इतवारा पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा क्रमांक 60/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,382 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शिवगर्जना कार्यक्रम… डुकरे पकडण्याची मशीन न विचारता का नेली यासाठी खून