नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची दि.19 रोज शुक्रवारी नवा मोंढा येथील मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकी ही दुसऱ्या टप्पात आली असून अनेक दिग्गज राजकीय मंडळीच्या प्रचार सभेने मैदाने गाजवली जात आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर यांचे प्रचारार्थ ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांची दि.19 एप्रिल रोजी नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आली. या सभेला लाखोच्या संख्येने मतदार उपस्थिती राहतील असा आशावाद वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. याचबरोबर जास्तीत जास्त मतदारांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,310 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकसभा मतदानासाठी 26 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी ; शुक्रवारी बाजार नाही; मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडण्याचे आवाहन मनपाचे भुखंड आपल्या नावे आहेत असे दाखवून विक्री करणाऱ्या पाच राजकीय लोकांना सक्तमजुरी आणि 2.5 लाख रुपये दंड