नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागातील स्थानिक गुन्हा शाखेने हतईपुरा कंधार येथे एका व्यक्तीच्या घरात धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1 लाख 88 हजार 298 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपले पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेवून कंधार येथे पाठविले.10 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने हतईपुरा कंधार येथील शेख नौशाद शेख ताहेर याच्या घरात छापा टाकला. त्या ठिकाणी प्रतिबंधीत केलेला 1 लाख 88 हजार 298 रुपयांचा गुटखा सापडला. पोलीस ठाणे कंधार येथे शेख नौशाद शेख ताहेर विरुध्द अन्न सुरक्षा मानके, नियम व नियमन प्रमाणे गुन्हा क्रमांक 130/2023 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी गुटखा कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवार, ज्वालसिंग बावरी, गजानन बैनवाड, किरण बाबर, अर्जुन शिंदे यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,237 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आयोगासाठी सर्व उमेदवार समान ; मुक्त व निःपक्ष निवडणुकांचे आश्वासन महात्मा ज्योतीबा फुले यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्यावतीने अभिवादन