नांदेड:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनीना व शिक्षकांना मतदार जनजागृती विषयी माहिती विचारली. कु. वैष्णवी कदम व शिक्षिका हंबर्डे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सीईओ मीनल करनवाल यांनी मुलींना मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेचे काम पाहून समाधान व्यक्त केले. Kanthak Suryatal Post Views: 597 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड लोकसभा उमेदवारांची 12 एप्रिलला प्रथम खर्च तपासणी; उमेदवारांना उपस्थिती अनिवार्य इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न ;नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन