इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न ;नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आयोजन

नांदेड :- 16 नांदेड लोकसभातंर्गत आज नियोजन भवन येथे नांदेड दक्षिणचे 220 व नांदेड उत्तरचे 142 असे एकूण 362 इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरुवात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने तयार केलेल्या पिपिटीद्वारे करण्यात आले. या पिपिटीमध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष विविध दाखले व उदाहरणे देवून समजून देण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थांना प्रक्रिया योग्यप्रकारे समजण्यास मदत झाली. हे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने व ललितकुमार वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

 

यावेळी प्रशिक्षण मंचावर तहसीलदार उमाजी बोथीकर, रामदास कोलगणे, श्रीमती प्रगती चौडेकर, कारभारी दीवेकर, उपायुक्त मनपा, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, बालाजी सोनटक्के, प्रशिक्षण विभाग सदस्य संघरत्न सोनसळे, संजय भालके, नागेश स्वामी तथा राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. पिपिटी नंतर संघरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता मनपा यांनी अत्यंत सविस्तरपणे विविध क्लिपद्वारे मतदान साहित्य हस्तगत करण्यापासून मतदान घेवून परत येईपर्यंतचे मार्गदर्शन केले. इव्हिएम यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपँटची जोडणी, सिलींग प्रक्रिया, आदर्श मतदान केंद्र रचना, विविध फॉर्म , माँकपोल, प्रदत्त मत, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील केंद्र कोणती, अशा केंद्राची वेब कास्टिंग करणे, मतदार सहाय्यता कक्षाद्वारे मतदारास कशी मदत केली जाईल, किमान सुविधा कोणत्या, प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहेत, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी डायरी, मतदान अधिकारी एक, दोन, तीनची कार्ये, विविध नमुने अशा अनेक बाबींवर भरीव मार्गदर्शन करण्यात आले.

 

या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे अचूक निरसन केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षिण देण्यात आले. हँन्ड्स आँन ट्रेनिंगच्या टप्प्यात मतदान यंत्र हाताळू देण्यात आल्यामुळे अनेक अडचणीवर मात करण्यात आली. मास्टर ट्रेनर म्हणून मनीष परदेशी, मोहन कलंबरकर, विवेकानंद मुधोळकर, गणेश भारती यांनी कार्य केले. या प्रशिक्षणास 362 पैकी 291 कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षणास यशस्वी करण्यासाठी विजयकुमार चोथवे, साधना देशपांडे, हनुमंत जाधव, मनिषा मुटकुळे, सुशीला ठाकरे, प्रतिभा मारतळेकर, निकीता म्याड व सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *