नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील चैतन्यनगर भागातील सहयाद्रीनगर येथील अचानक पहाटे लागलेल्या अगीत पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. यात दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते. दि.8 एप्रिल रोज सोमवार पहाटे 6 वाजेच्यासुमारास दुकानातून धुर निघत असल्याची माहिती परिसरातील नागरीकांना मिळाली. याबाबत अग्नीशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आल. ही आग विझवत असतांनाच अचानक दुकानात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात कोणतीही जिवीत हाणी झाली नसली तरी अग्नीशमन यंत्रणेला आगी अटोक्यात आण्यात यश मिळाले तरी या अगीमध्ये पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. लाखो रुपयांचे साहित्य या आगीत जळून खाक झाली आहेत. आग विझवतांना झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील नागरीकांमध्ये काहीवेळ भितीचे वातावरण होते. अग्नीशमन दलाच्यावतीने ही आग विझवली जात असतांना कर्मचाऱ्यांना देखील या स्फोटचा सामना करावा लागला असला तरी यात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. Kanthak Suryatal Post Views: 806 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड लोकसभेसाठी 23 जण रिंगणात तर 43 जणांची माघार जिल्हा शल्य चिकित्सक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट उप जिल्हा रुग्णालय बांधकाम पाहणी