प्रचार विषयक सर्व परवानग्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना

नांदेड-.16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांना निवडणूक प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे होण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापना करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

 

हेलिकॉप्टर उड्डाण उतरविणे यासाठीची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येईल. एक खिडकी कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना विविध परवानग्यासाठी ऑनलाईन अर्ज सुध्दा दाखल करता येईल. उमेदवारांना, राजकीय पक्षांना विविध परवानगीसाठी लॉगईन करण्यासाठी वेबसाईट https://suvidha.eci.gov.in/pc/public/login आहे.

 

उमेदवारांनी, राजकिय पक्षांनी परवानग्यासाठी 48 तास अगोदर अर्ज करणे आवश्यक राहील. हेलिकॉप्टर उड्डाण व उतरविणे साठी परवानगी , तात्पुरते प्रचार कार्यालय, बैठक, सभा, जाहीरसभा व लाऊडस्पिकर परवानगी, कार्नर सभा, रॅली, वाहन परवानगी, वाहन परवानगी जिल्हाअंतर्गत, प्रचार साहित्य परवानगी या परवानग्यांसाठी एक खिडकी कक्षाकडे 48 तास अगोदर अर्ज करणे आवश्यक राहील असे आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *