हिऱ्यांच्या दुकानाला लागली आग

 

 

नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.

शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्यावर मलाबार ही हिऱ्यांची दुकान आहे. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या दुकानाला अचानकच मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे कार्यालय जवळच असल्याने पाचच मिनिटात अग्निशमन पोहोचले आणि आग विझविली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती, आणि बाहेर दिसणाऱ्या शो ला आगीने घेरले. दुकानाच्या आत संपत्तीचे जास्त नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *