16 वर्ष 6 महिन्याचा घरातून निघून गेलेला बालक शोधण्यासाठी जनतेने मदत करावी-लिंबगाव पोलीसांचे आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-घरात शिक्षणासंबंधाने वाद झाल्यानंतर 16 वर्ष 6 महिन्याचा अल्पवयीन बालक घरातून निघून गेला आहे. तो अल्पवयीन असल्याने लिंबगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सोबतच या बालकाचा शोध होण्यासाठी शोधपत्रिका जारी केली आहे.
पोलीस ठाणे लिंबगावच्या हद्दीत राहणारा संतोष रुद्राजी सुर्यवंशी(16 वर्ष 6 महिने) या अल्पवयीन बालकाचे आपल्या घरातील नातेवाईकांसोबत पुढील शिक्षण संबंधाने चर्चा झाली तेंव्हा वाद झाला. त्यानंतर तो बालक 5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आपल्या वडीलांसोबत शेतात गेला. परंतू तो शेतातून घराकडे जातो असे वडीलांना सांगून निघाला. 4 वाजता वडील घरी आले तेंव्हा त्यांचा मुलगा संतोष हजर नव्हता. घरात त्याचे दोन ड्रेस आणि बॅग दिसली नाही. तेंव्हा घरच्या मंडळीने नातलगांकडे याचा शोध घेतला आणि तो मिळून आला नाही म्हणून पोलीस ठाणे लिंबगाव येथे तक्रार दिली. बालक संतोष रुद्राजी सुर्यवंशी याचे वय अल्पवयीन असल्यामुळे या संबंधाने लिंबगाव पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा क्रमांक 48/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर यांच्याकडे देण्यात आला आहे.
लिंबगाव पोलीसांनी संतोष सुर्यवंशीचा शोध व्हावा म्हणून शोध पत्रिका जारी केली आहे. संतोषचा रंग गोरा आहे. चेहरा लांबट आहे. उंची 5 फुट 8 इंच आहे. बांधा सडपातळ आहे. त्याने घरातून निघतांना तपकीरी रंगाचा पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला आहे. संतोषचे केस बारीक आहेत. त्याचे नाक सरळ आहे, त्याला मराठी व हिंदी भाषा बोलतात येते. त्याच्यासोबत बॅग व दोन शर्ट, दोन पॅन्ट असे साहित्य आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवी यांनी जनतेला आवाहन केले आहे की, वरील वर्णनाचा आणि छायाचित्रात दिसणारा बालक कोणाला भेटला किंवा दिसला तर त्यांनी या बाबत पोलीस ठाणे लिंबगाव येथे माहिती द्यावी. लिंबगाव पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-270033, सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवी यांचा मोबाईल क्रमांक 7744827771 आणि पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर यांचा मोबाईल क्रमांक 8830763211 यावर सुध्दा माहिती दिली तर बालकाचा शोध घेण्यास मदत होईल.

One thought on “16 वर्ष 6 महिन्याचा घरातून निघून गेलेला बालक शोधण्यासाठी जनतेने मदत करावी-लिंबगाव पोलीसांचे आवाहन

  1. माहिती संकलन छान आहे. लक्ष ठेऊ व सापडल्यास किंव्हा कुठे आढळून आले तर माहिती देऊ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *