दारु पिण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून बायकोचा खून

नांदेड(प्रतिनिधी) -आपल्या पत्नीने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून नवऱ्याने तिचा गळादाबून तिचा खून केल्याचा प्रकार मौजे मनुर ता.नायगाव येथे घडला आहे.
महेश हवगिराव तळगे रा.धानोरा ता.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहिण लक्ष्मीबाई यांचे लग्न शंकर एकनाथ हांडेवार रा.मनुर ता.नायगाव यांच्यासोबत झाले होते. दि.15 मार्च रोजी सकाळी त्यांचे प्रेत घरात पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी येवून पाहणी केली. त्यांना माहित असलेल्या शंकर हंडेवारच्या सवईनुसार त्यांनी तक्रारीत लिहिले आहे की, मयत बहिण लक्ष्मीबाई शंकर हांडेवार (33) हिला शंकर एकनाथ हांडेवार (40) याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. तेंव्हा लक्ष्मीबाईने विरोध केला. त्यावेळी तिचा गळा दाबून शंकरने लक्ष्मीबाईचा खून केला आहे.
कुटूंर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 44/2024 दाखल केला असून कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सोनुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *