नांदेड(प्रतिनिधी)-एका उभ्या ट्रकचे दहा टायर आणि पाच डिस्क तीन जणांनी चोरून 1 लाख 60 हजारांचा ऐवज नेल्याची तक्रार तीन लोकांविरुध्द दाखल झाली आहे. गुरूनाथ उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आपला ट्रक क्रमांक एम.एच.26 सी.एच.7117 हा कौठा येथील बॉम्ब शोध आणि नाशक कार्यालयाजवळ उभा केला होता. 20 जुलैच्या रात्री 8.30 वाजेच्यासुमारास लखन धर्मा जाधव रा.येरसी ता.कळमनुरी जि.हिंगोली, संदीप मधुकर राठोड रा.लोहारा ता.औंढा जि.हिंगोली आणि गुरमितसिंघ संधू रा.नांदेड या तिघांनी त्या उभ्या ट्रकमधील 10 टायर, 5 डिस्क असा 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा चोरीचा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 645/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,005 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation चळवळीतील सच्चा नेत्यांना बळ द्या-प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन रिठा ता.भोकर येथून 23 वर्षीय युवक गायब