जुन्या नरसी गावात 6 लाख 90 हजार रोख रक्कम चोरीला गेली

नांदेड(प्रतिनिधी)- नरसी जुने गाव येथे 12-13 मार्चच्या रात्री चोरट्यांनी घरफोडून 6 लाख 90 हजारांची रोख रक्कमेची चोरी केली आहे.
पांडूरंग गणपती पाटे रा.मल्हारनगर जुने गाव नरसी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 मार्चच्या रात्री 10 ते 13 मार्चच्या सकाळी 6 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि घराच्या लॉकरमध्ये ठेवलेले 6 लाख 90 हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. रामतिर्थ पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 457, 380 नुसार गुन्हा क्रमांक 63/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जगताप यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *