नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या काकाला दारु पिलेल्या अवस्थेत लाकडाच्या बडग्याने बडवून 16 वर्षाच्या पुतण्याने खून केल्याचा प्रकार पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत घडला आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार 26 मार्च रोजी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान घडला. या संदर्भाने मरण पावलेल्या 42 वर्षीय व्यक्तीच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार 26 मार्च रोजी त्यांचे आजोबा शेतात झोपडी बांधत असतांना त्यांच्या वडीलांनी आजोबासोबत भांडण केले. सोबतच शेजारच्या शेतात अर्थात काकाच्या शेतात असलेली कोंबडी खाण्यासाठी घेवून जातो असे काकाला सांगितले. यावरून भांडण झाले. त्यानंतर ते दारु पिलेल्या अवस्थेत झोपले असतांना काकाच्या मुलाने लाकडाच्या बडग्याने(मोठे लाकुड) त्यांना दोन्ही पायावर, पाठीवर, शरिरावर अनेक ठिकाणी बडवून जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सोनखेड पोलीसांनी या प्रकरणी खून करणाऱ्या अल्पवयीन बालकाविरुध्द गुन्हा क्रमांक 56/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,681 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट कागदपत्र बनविणाऱ्या दोन महिलांसह तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने तिसरे गावठी पिस्टल पकडले