मुखेड बसस्थानकात महिलेचे 1 लाख 32 हजारांचे दागिणे बळजबरीने चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरातील बसस्थानकामध्ये बसची वाट पाहणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेचे दागिणे चोरट्यांनी बळजबरी चोरून नेले आहेत.
दि.7 मार्च रोजी सायंकाळी 6.45 वाजता शोभा विश्र्वनाथ स्वामी या अंगणवाडी मदतनिस मुखेड बसस्थानकात आपली मैत्रीण धनश्रीसोबत बसची वाट पाहत उभ्या होत्या. एवढ्यात काही चोरट्यांनी त्यंाच्या गळ्यातील एकदानी, बोरमाळ, मनीमंगळसुत्र, नेकलेस असे सोन्याचे एकूण 1 लाख 32 हजारांचे दागिणे बळजबरीने चोरून नेले आहेत. या बाबत मुखेड पोलीसांनी भारती दंड संहितेच्या कलम 394, 392 प्रमाणे गुन्हा क्रमांक 78/2024 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *