नांदेड(प्रतिनिधी)-किनवट शहरातील साईनगर भागात असणारे आयप्पा स्वामीचे मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 33 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विकास मुकूंदराव नेमाणीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जनूच्या रात्री 10.30 ते 17 जूनच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान किनवट शहरातील साईनगर भागात असलेल्या आयप्पा स्वामी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि अर्धा किलो चॉंदीचे मुकूट, तिन ग्रॅम सोने तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम असा एकूण 1 लाख 33 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 162/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 922 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कौठा दरोड्याचा तपास जलद गतीने करा- मागणी इलेक्शन का रिझल्ट तथा न्युज चैनल तथा सोशल मीडिया पर चल रही चर्चा