नांदेड(प्रतिनिधी)-बेकायदेशीररित्या नशा निर्माण करणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्याविरुध्द भाग्यनगर पोलीसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार प्रदीप संभाजी गर्दनमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी तरोडा नाका ते छत्रपती चौक जाणाऱ्या रस्त्यावर विशाल राजू देशमुख (29) या व्यक्तीची तपासणी केली तेंव्हा त्याच्या ताब्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नशा आणणाऱ्या एकूण 160 गोळ्या मिळाल्या. त्याची किंमत 11 हजार 200 रुपये आहे. या गोळ्या विशाल देशमुख अनाधिकृतपणे विक्री करण्यासाठी घेवून जात होता. हा प्रकार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास पोलीसांनी शोधला. भाग्यनगर पोलीसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 22(बी) व 8(सी) प्रमाणे गुन्हा क्रमांक 446/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,318 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यानेच जल जीवन मिशनच्या 7 लाखाचा अपहार केला चोर महिलेला भाग्यनगर पोलीसांनी काही तासातच पकडले