नांदेड(प्रतिनिधी)-पवित्र श्रावण मास महिनामध्ये तपोनुष्ठान मुखेड येथील गणाचार्य मठ येथे श्री.108 डॉ.वीरुपक्ष शिवाचार्य महाराज यांचे 17 वे श्रावण मास अनुष्ठाण आयोजित करण्यात आले होते. या अनुष्ठाणाचा सामारोप सोहळा श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर यांच्या सानिध्यात संपन्न होणार आहे. गणाचार्य मठ संस्था मुखेडचे श्री.108 डॉ.वीरुपक्ष शिवाचार्य महाराज यांचे 17 वे श्रावण मास तपोनुष्ठान सोहळा दि.5 ऑगस्टपासून सुरू झाला होता. दररोज धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये इष्ठलिंग महापुजा, रुद्राभिषेक, प्रवचन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यामध्ये करण्यात आले होते. या श्रावणमास तपोनुष्ठाण समाप्ती सोहळा दि.26 ऑगस्ट रोज सोमवारी ना.संजय बनसोडे, खा.डॉ.अजित गोपछडे, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार, भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे, बालाजी पाटील खतगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी धर्मसभा आणि महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहीे अशी माहिती गणाचार्य मठ संस्थान यांच्यावतीने देण्यात आली. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक क्तांनी ाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 1,126 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विष्णुपूरी जलाशयाचे दोन दरवाजे उघडले तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी घेतले दर्शन