नांदेड :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 1,141 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ.वीरुपाक्ष शिवाचार्य यांचे सोमवारी तपोनुष्ठान समाप्ती सोहळा नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ