नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने आज तीन तहसीलदारांना नवीन पदस्थापना दिल्यात त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या भरत सुर्यवंशी यांना पाठविले आहे.
राज्य शासनाच्या महसुल विभागातील सहसचिव अजित देशमुख यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी झालेल्या शासन निर्णयात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले भरत सुर्यवंशी यांना देगलूर येथील रिक्त पदावर तहसीलदार म्हणून पाठविले आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले दुसरे तहसीलदार सतिश माशाळ यांना तहसीलदार ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर येथे पाठविले आहे. जळगाव जामोद जि.बुलढाणा येथील तहसीलदार शितल सोलाट यांना जिल्हा जळगावमधील भडगाव तहसील येथे तहसीलदार पदी पाठविलेले आहे.