नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने आज तीन तहसीलदारांना नवीन पदस्थापना दिल्यात त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या भरत सुर्यवंशी यांना पाठविले आहे. राज्य शासनाच्या महसुल विभागातील सहसचिव अजित देशमुख यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी झालेल्या शासन निर्णयात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले भरत सुर्यवंशी यांना देगलूर येथील रिक्त पदावर तहसीलदार म्हणून पाठविले आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले दुसरे तहसीलदार सतिश माशाळ यांना तहसीलदार ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर येथे पाठविले आहे. जळगाव जामोद जि.बुलढाणा येथील तहसीलदार शितल सोलाट यांना जिल्हा जळगावमधील भडगाव तहसील येथे तहसीलदार पदी पाठविलेले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,118 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे पत्रकार धनंजय सोळंके यांना राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान