नांदेड(प्रतिनिधी)-नल्लागुट्टाचाल भागातील एक घर बंद करून त्या घरातील कुटूंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी ते घरफोडून 1 लाख 26 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. गणेश नरसय्या अंधे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपले घर बंद करून कुटूंबासोबत तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे सासुरवाडीला गेले होते. या बंद असलेल्या घराचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान कधी तरी त्यांचे घरफोडून घरातील 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस 91 हजार रुपये किंमतीचे आणि 5 ग्रॅम वजनाची अंगठी 35 हजार रुपये किंमतीची असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा घटना क्रमांक गुन्हा क्रमांक 416/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक किरवले यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 772 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हडको येथील ज्ञानेश्वर नगर भागात युवकावर चाकुहल्ला; पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले शेतीच्या वादातून रुई ता.माहुर येथे युवकाचा खून