नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी गोवर्धनघाट पुलावरून नदी उडी मारलेल्या एका युवकाचे प्राण गोदावरी जिवरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले. आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास गोवर्धनघाट पुलावरून एका युवकाने गोदावरी नदी पात्रात उड्डी मारली. याचवेळी गोदावरी नदीपात्रात उपस्थित असलेल्या गोदावरी जिवरक्षक दलाचे सय्यद मुस्ताक, शेख हबीब, शेख लतीफ, शेख सलीम यांनी त्वरीत पाण्यातून त्या युवकाला बाहेर काढले. या युवकाचे नाव नागनाथ गजरवाड रा.पौर्णिमानगर असे आहे. घडलेल्या घटनेबद्दल गोदावरी जिवरक्षक दलाने पोलीस ठाण्याला माहिती दिली. डॉक्टरांनी हा युवक सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. युवकाचे प्राण वाचविणाऱ्या गोदावरी जिवरक्षक दलाचे सर्वचस्तरातून अभिनंदन होते आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,885 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा जिव कोण वाचवणार म्हणत डॉक्टरांचा बंद आजचे नांदेड बंद शांततेत