नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील अन्यायाविरुध्द आपला रोष व्यक्त करतांना नांदेड येथील आयएमई संघटनेने आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा कोण वाचवणार? या शब्दात आपल्या व्यथा मांडल्या. आज सकाळी डॉक्टरांच्या संघटनेने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. पश्चिम बंगालमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्देवी तर आहेच. पण या दुर्घटनेबद्दल आपला रोष व्यक्त करतांना आम्ही तुमचा जिव वाचवावा आमचा कोण वाचविणार असे डॉक्टर बोलत होते. आज डॉक्टरांनी बंद पुकारल्यामुळे शहर भरातील दवाखाने बंद होते. तरीपण डॉक्टरांनी मानवतेच्या दृष्टीकोणातून गरजवंत रुग्णांना उपचार दिले. Kanthak Suryatal Post Views: 1,004 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप गोदावरी जिवरक्षक दलाने एकाचे प्राण वाचविले