नांदेड (जिमाका)- -जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख यांची पदस्थापना शासन आदेशान्वये करण्यात आली आहे. त्या अन्वये डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख या 16 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर रुजू झाल्या आहेत. आरोग्य सेवेतील कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून यापुर्वी त्या वाशिम येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व सांगली येथे जिल्हा हिवताप अधिकारी तसेच सातारा येथे तालुका आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड या पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले. या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले. Kanthak Suryatal Post Views: 1,220 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना नवीन नियुक्त्या 17 वर्षीय बालिकेचा विनयभंग; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल