नांदेड(प्रतिनिधी)-जुलै 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यात नव्याने नियुक्तीस आलेले दोन पोलीस निरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि आठ पोलीस उपनिरिक्षक यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नविन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नव्याने आलेले पोलीस निरिक्षक भुजंग विठ्ठलराव गोडबोले यांना जीपीयु येथे पाठविण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक अनंत ज्ञानदेव भंडे यांना पोलीस ठाणे मरखेल येथे पाठविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधाकर विठ्ठलराव खजे यांना पोलीस ठाणे कंधार येथे नियुक्ती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर पांडूरंग शिंदे यांना पोलीस ठाणे बिलोली येथे नियुक्ती मिळाली आहे. यासोबत इतर सात पोलीस उपनिरिक्षकांना पुढील प्रमाणे नियुक्ती मिळाली आहे. देवानंद शंकर पडेवार-वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट, रोहन प्रकाश पाटील-पोलीस ठाणे लोहा, उमेश किशनराव कदम-पोलीस ठाणे शिवाजीनगर, नरेश केशव वाडेवाले-पोलीस ठाणे भाग्यनगर, प्रदीप गोरखनाथ साखरे-पोलीस ठाणे विमानतळ, सचिन मुकूंदराव आरमळ-पोलीस ठाणे उमरी, सय्यद निजाम सय्यद मुसा-पोलीस ठाणे लिंबगाव आणि पोलीस ठाणे भाग्यनगर येथे सन 2023 पासून कार्यरत पोलीस उपनिरिक्षक प्रकाश गणपतराव आवडे यांना पोलीस नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,017 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 14 हजार 760 कोटी रुपयांचा वीज शेतकऱ्यांना मोफत मिळणार जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर डॉ. संगिता चंद्रकांत देशमुख रुजू