सलग 2 दिवसांच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 2,917 प्रकरणे उघडकीस नांदेड (प्रतिनिधी) – सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत विभागातील विविध रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे, वैध तिकीटधारक प्रवाशांचे हित जपणे तसेच सर्व प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक 06.11.2026 रोजी नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनातिकीट व अनियमित प्रवासाची एकूण 1,502 प्रकरणे उघडकीस आली असून भाडे व दंडापोटी ₹13,56,475 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. यापूर्वी दिनांक 05.11.2026 रोजी राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत 1,415 प्रकरणे उघडकीस आणून ₹12,19,465 इतकी रक्कम वसूल करण्यात आली होती. अशा प्रकारे सलग 2 दिवसांच्या मोहिमेत एकूण 2,917 प्रकरणे उघडकीस आणून ₹25,75,940 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. अनधिकृत प्रवासाला प्रतिबंध घालणे आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. दिनांक 06.11.2026 रोजीची ही विशेष तपासणी मोहीम मध्यरात्री 00:00 वाजेपासून रात्री 23:50 वाजेपर्यंत राबविण्यात आली. या मोहिमेत 31 तिकीट तपासणी कर्मचारी, 01 रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) कर्मचारी तसेच सर्व तिकीट तपासणी पथकांनी सहभाग घेतला. या दरम्यान एकूण 26 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासाची 914 प्रकरणे, अनियमित प्रवासाची 421 प्रकरणे आणि विनानोंदणी सामानाची 167 प्रकरणे आढळून आली. संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार भाडे व दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. या विशेष मोहिमेचे निरीक्षण श्री. शैलेश कुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी केले. या विशेष तिकीट तपासणी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीत संबंधित पथक प्रमुखांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: 1. संजय आळणे – मुख्य तिकीट निरीक्षक, विभागीय फ्लाइंग स्क्वॉड-1, नांदेड. 2.महेंद्र पी. एल. – तिकीट प्रवास निरीक्षक, विभागीय फ्लाइंग स्क्वॉड-2, परभणी. 3 एम. एन. बालसुंदर – मुख्य तिकीट निरीक्षक, विभागीय फ्लाइंग स्क्वॉड-3, छत्रपती संभाजीनगर. 4. संदीप दुबे – मुख्य तिकीट निरीक्षक, विभागीय फ्लाइंग स्क्वॉड-4, अकोला. 5. एम. डी. नईमुद्दीन – मुख्य तिकीट निरीक्षक, मॅजिस्ट्रेट स्क्वॉड. 6. सुरेश मीना – मुख्य तिकीट निरीक्षक, मुख्यालय, नांदेड. नांदेड विभाग सर्व प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे. विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालणे, वैध तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि रेल्वे सुविधांचा वापर केवळ अधिकृत प्रवाशांनीच करावा, यासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासन सर्व प्रवाशांना आवाहन करते की, त्यांनी वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करून प्रवासादरम्यान शिस्त राखण्यास हातभार लावावा. Kanthak Suryatal Post Views: 119 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अंशकालीन स्त्री परिचरांच्या आंदोलनाला तूर्तास स्थगिती