नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी काही जणांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका 23 वर्षीय युवकचा खून केल्याचा प्रकार बळीरामपुर भागात घडला आहे. या बाबत वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी तिसरा खून झाला आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमीनगर बळीरामपुर भागात राहणारे व अमोल रामेश्र्वर लांडगे(23) यास काल दि.24 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास काही जणांनी मारहाण करून त्याचा खून केला आहे. या बाबत पोलीस ठाण्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप प्रक्रिया पुर्ण झालेली नाही असे सांगितले. आमच्या सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे अमोल लांडगेसोबत जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला झाला आणि त्याचा खून करण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 651 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सुनेने केली सासुची 17 लाख 86 हजारांची फसवणूक नांदेड शहरात २२ केंद्र तर गावांमध्ये शिबीर लाडकी बहीण योजनेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद