नांदेड(प्रतिनिधी)-नातेवाईकाच्या घरी हळदीच्या कार्यक्रमाला जाणे देगलूरमधील एका कुटूंबाला महागात पडले आणि त्यांच्या घरातून चोरट्यांनी 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
महेश महादप्पा यांचे घर विशालनगरच्या पाठीमागे देगलूर येथे आहे.12 जुलै रोजी रात्री 9 वाजता त्यांच्या नातलगाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता म्हणून सर्व कुटूंब तिकडे गेले होते.13 जुलैच्या रात्री 2 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, हळदीचा कार्यक्रम आपल्याला महागात पडला. चोरट्यांनी घरातील ड्रेसींग टेबलच्या ड्राव्हरमध्ये असलेल्या कपाटाची चाबी घेवून त्या चाबीने कपाट उघडून सोन्या-चांदाीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.देगलूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 305, 331(4) प्रमाणे गुन्हा क्रमांक 3114/2024 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.