नांदेड :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून दरवर्षी “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार 26 जून 2024 रोजी “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना निर्देश दिले आहेत. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि. 28 एप्रिल 2006 दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि.प. समाज कल्याण अधिकारी, उच्च शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी निरंतर जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा क्रीडाधिकारी, प्राचार्य तंत्रशिक्षण, प्राचार्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सहा. आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी योग्य ती कार्यवाही करावी व कार्यवाहीचा अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 988 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सिकलसेल तपासणी करा आणि सिकल आजाराची साखळी खंडीत करा शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत