नांदेड (प्रतिनिधी) – प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच रेल्वे प्रवास करावा, विनातिकीट प्रवासाला आळा बसावा तसेच रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत 12 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर 2026 रोजी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विभागातील सर्व तिकीट तपासणी पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही दिवशी एकूण 58 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 4 रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले. एकूण 53 रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या अनियमित प्रवासाची एकूण 2,155 प्रकरणे आढळून आली असून, त्यातून एकूण ₹15,44,315 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. 12 नोव्हेंबर 2026 रोजीची तपासणी मोहीम : 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 00:00 ते रात्री 23:59 या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 29 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 RPF कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण 27 रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे प्रकरणे आढळून आली : तिकीट नसलेला प्रकरणे: 717 भाडे : ₹2,94,510; दंड : ₹3,64,500 अनियमित प्रवास प्रकरणे: 318 भाडे : ₹1,07,690; दंड : ₹1,60,930 बुक न केलेले लगेज प्रकरणे: 276 वसूल रक्कम : ₹47,970 या दिवशी एकूण 1,311 प्रकरणांची नोंद करण्यात आली आणि ₹9,75,600 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत अनधिकृत फेरी वाल्यांविरूद्ध 1 प्रकरण नोंदवून ₹2,000 दंड वसूल करण्यात आला. 16 नोव्हेंबर 2026 रोजीची तपासणी मोहीम : 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 04:00 ते रात्री 20:00 या कालावधीत सर्व तिकीट तपासणी पथकांच्या सहभागाने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 29 कर्मचारी आणि 2 RPF कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण 26 रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान : तिकीट नसलेला प्रकरणे: 523 भाडे : ₹2,12,660; दंड : ₹2,61,500 अनियमित प्रवास प्रकरणे: 68 भाडे : ₹24,735; दंड : ₹34,300 बुक न केलेले लगेज प्रकरणे: 253 वसूल रक्कम : ₹35,520 या दिवशी एकूण 844 प्रकरणे नोंदविण्यात आली असून ₹5,68,715 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या अशा विशेष तपासणी मोहिमांचा मुख्य उद्देश विनातिकीट तसेच अनियमित प्रवासाला प्रतिबंध करणे, योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याबाबत प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रामाणिकपणे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करणे हा आहे. तसेच रेल्वेच्या नियमांचे पालन सुनिश्चित करून सुरक्षित, शिस्तबद्ध आणि जबाबदार प्रवास संस्कृती निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत आहेत. या दोन्ही विशेष मोहिमांचे निरीक्षण शैलेश कुमार, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नेहमी वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा, रेल्वेच्या नियमांचे पालन करावे आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. Kanthak Suryatal Post Views: 284 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धक्कादायक! डेहराडूनच्या रस्त्यांवर खाकी विरुद्ध खाकीचा भीषण संग्राम; सीएम हाऊस घेरणाऱ्या PRD जवानांवर पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज! शहाजी उमाप केवळ तक्रारी ऐकून थांबणार नाहीत; प्रत्येक अर्जाचा फीडबॅक घेणार!