मुखेड (प्रतिनिधी) :- देवारा बाहेर फेकून दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका महिलेच्या निर्घृण हत्येत झाले. विळ्याने गळ्यावर, डोक्यावर आणि मानेवर वार करून ५५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुखेड तालुक्यातील हसनाळ येथे १७ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत लक्ष्मीबाई चंदर गदले (वय ५५, रा. हसनाळ, ता. मुखेड) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास हसनाळ येथे आरोपी मारोती भुजंग गायकांबळे (वय ४५, रा. फुलेनगर, ता. देगलूर) याने लक्ष्मीबाई गड्डले यांच्या घरातील देवारा घराबाहेर फेकून दिला. देवारा घराबाहेर का फेकला, असा जाब लक्ष्मीबाई यांनी आरोपीला विचारला. याच कारणावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने विळ्याने लक्ष्मीबाई यांच्या गळ्यावर, डोक्यावर आणि मानेवर वार करून त्यांचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हसनाळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा दीपक चंदर गदले (वय ३२, रा. हसनाळ, ता. मुखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत असून, संबंधित आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घरातील देवघरातील देवारा बाहेर फेकल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेचा जीव गेल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 151 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या बळीरामपूर येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धाड: ५ आरोपींवर गुन्हा दाखल, ३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त विश्वकर्मा मंदिर परिसरात घरफोडी; ३८ हजारांचा ऐवज लंपास