इतवारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; विधिसंघर्षित बालकाकडून चोरीचा मोबाईल जप्त, दुसरा आरोपी फरार नांदेड : शहरातील जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत इतवारा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मोबाईल हिसकावून नेण्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन चोरीस गेलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इतवारा परिसरातील शक्तीनगर येथील किशनलाल कुरिल (वय ४८, व्यवसाय मजुरी) हे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी बाफना टी-पॉईंट ते शक्तीनगर रोडने पायी घरी जात होते. शक्तीनगर चौकात आले असता मोटारसायकलवरून पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या आरोपीने त्यांच्या शर्टच्या खिशातील ओप्पो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या प्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्याआधारे अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. तपासादरम्यान एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी आणि चोरीसाठी वापरण्यात आलेल्या मोटारसायकलचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, पोलीस अंमलदार बंडू कलंदर, सदाशिव कदम, जावेद, हरप्रीतसिंह सुखई, शोएब, रेवणनाथ कोरनुळे व बालाजी हिंगणकर यांनी ही कामगिरी पार पाडली. चोरीचा मोबाईल जप्त झाला असला तरी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास इतवारा पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 49 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचे १ लाख ३८ हजारांचे दागिने लंपास